भाजप नेत्याने सुचवले राहुल गांधींना नवे आडनाव

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या रेप इन इंडिया विधानावरून संसदेत बराच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या अनेक नेत्यांकडून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली. परंतु राहुल गांधी त्यांच्या विधानावर ठाम असून ‘माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे कदापि माफी मागणार नाही’ अशा शब्दात भाजपवर पलटवार केला आहे. तर आता या विधानामुळे आता तीव्र प्रतिसाद उमटत आहेत.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत भारत बचाओ रॅली काढली आहे. या रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला बोल केला आहे. तसेच आपण केलेल्या विधानाबद्दल माफी मागण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी राहुल यांना नवं आडनाव सुचवलं आहे.

नरसिंहराव यांनी एक ट्विट केलं असून, राहुल यांनी जिन्ना आडनाव लावावं, असा सल्ला त्यांनी या ट्विटद्वारे दिला आहे. ‘तुम्हाला गांधी नव्हे, जिन्ना आडनाव जास्त शोभून दिसेल. मुस्लिमांच्या लांगुलचालनाच्या राजकारणामुळे आणि मानसिकतेमुळे तुम्ही सावरकरांचे नाहीत, तर मोहम्मद अली जिन्नांचे योग्य वारसदार शोभता,’ अशा शब्दांमध्ये राव यांनी राहुल यांच्यावर पलटवार केला. राव यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काँग्रेसलादेखील टॅग केलं आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here