नगरसेवक राहूल भंडारे यांच्या टाटा गार्डन (चंदननगर) येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पुणे : लोक प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या नगरसेवकांकडून अनेक अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी लोकांमध्ये मिसळून काम करणे आवश्यक असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक राहूल भंडारे यांच्या टाटा गार्डन (चंदननगर) येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. तसेच भंडारे यांचे प्रभागातील काम चांगले असून त्यांनी या पुढेही नागरिक तसेच पक्षासाठी हे काम असेच अविरतपणे सुरू ठेवावे असेही ते म्हणाले.
महापौर मुरलीधर मोहळ,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी आमदार जगदीश मुळीक, आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेवक अनिल बॉबी टिंगरे, नाना सांगडे, नगरसेविका शीतल शिंदे, नगरसेविकामुक्ता जगताप, सुनीता गलांडे, नगरसेवक संतोष राजगुरू यांच्यासह स्थानिक नागरीकही मोठया संख्येने उपस्थित होते.