ईशान्य भारताबाबत अमेरिकेचा इशारा

वॉशिंग्टन : ईशान्य भारतात प्रवास करताना नगरिकांनी दक्षता बाळगावी, अशी सुचना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) निषेधार्थ येथे हिंसाचार उफाळला असल्याने ही सुचना जारी करण्यात आली आहे.

अमेरिकन सरकारने त्यांचे आसाममधील सरकारी दौरे तातपुरते स्थगित केले आहेत. माध्यमांतून येत असलेल्या निदर्शनांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या नागरिकांनी ईशान्य भारतात प्रवास करताना काळजी घ्यावी. काही भागात सरकारने संचारबंदी जारी केली आहे. इंटरनेट आणि मोबाईल सेवा विस्कळीत होऊ शकते. वाहतूक रोखली जाऊ शकते, अशा सुचना केल्या आहेत.

यापुर्वी तेथे गेलेल्या नागरिकांनी निदर्शनांच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. अन्य लोकांसह सुरक्षित ठिकाणी रहावे, असेही सुचना पत्रात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.