पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज भारतीय जनता पार्टीची तुलना वसाहतीच्या काळात आपले राज्य बळकट करण्यासाठी जातीय तणाव वाढवणाऱ्या ब्रिटीशांबरोबर केली. पत्रकारांबरोबरच्या मुक्त वार्तालापादरम्यान लालूप्रसाद यादव यांनी भाजपबरोबर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही जोरदार टीका केली.
“सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी नितीश कुमार कोणाबरोबरही युती करू शकतात. यात काहीही शंका नाही. मात्र ते दाऊद इब्राहिमबरोबरही हातमिळवणी करायलाही तयार असल्याचे वक्तव्य छेडी पासवान यांनी करायला नको होते.’ असे लालूप्रसाद यादव म्हणाले.
ससाराम येथील भाजपचे खासदार छेडी पासवान यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे संयुक्त जनता दलामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.
बेरोजगारीच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी भाजप धार्मिक मुद्यांचा आधार घेत आहे. एका जातीला दुसऱ्या जातीविरोधा भडकावणाऱ्या ब्रिटीशांनी आपल्या पूर्वजांनी घालवून दिले आहे. त्याच प्रमाणे भाजपलाही घालवून द्यावे. त्यासाठी अखिलेश यांना विजयी करावे, असे लालू म्हणाले.
लालूंच्या राष्ट्रीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदासाठी या महिन्यात पक्षांतग्रत निवडणूक होणार आहे. लालूंनी पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.