नवी दिल्ली – भाजपने आज सहा वेगवेगळ्या राज्यांसाठी नवीन प्रभारींची नियुक्ती केली. रविंद्र राजू यांच्याकडे हरियाणाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रत्नाकर यांच्याकडे बिहारचे सरचिटणीस म्हणून तर भवानी सिंग आणि करमवीर सिंग यांच्याकडे उत्तर प्रदेशचे सह सरचिटणीस म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अभय कुमार गिरी यांच्याकडे मणिपूर आणि नागालॅन्डचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. प्रद्युम्न यांच्याकडे पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयाच्या संयोजक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.