आगरतळा :– त्रिपुरात माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या गोमती जिल्ह्यातील विडिलोपार्जित घराजवळ भाजप आणि मार्क्सवादी पक्षाच्या समर्थकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली त्यात काही जण जखमी झाले आहेत.
मंगळवारी रात्री जामजुरी भागात झालेल्या चकमकीत सहभागी असल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, बाकीच्यांचा शोध घेतला जात आहे.
देब यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या वडिलोपार्जित घरात चार दिवसीय यज्ञ बुधवारी सुरू होणार होता.त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी घर आणि आजूबाजूचा परिसर सजवला, तर सीपीआय(एम) समर्थकांच्या गटानेही त्यांच्या कार्यक्रमासाठी पक्षाचे झेंडे लावले होते.
Government of Gujarat : गुजरात सरकारच्या ‘त्या’ विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी
त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला त्यातून ही धुमश्चक्री झाली. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली. त्या ठिकाणी आता जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.