BJP Candidate List । भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पाचवी यादी जाहीर केली. यावेळी भाजपने 111 उमेदवारांची नावे जाहीर केलीत. त्यात उत्तर प्रदेशातील 13 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीत. मात्र या यादीत भाजपने बाराबंकी मतदारसंघात आपला उमेदवार बदललाय.
बाराबंकी लोकसभा मतदारसंघात भाजपने उपेंद्र सिंह रावत याना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पक्षाची मोठी अडचण झाली. त्यानंतर रावत यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. ट्विटरवर त्यांनी यासंबधी घोषणा केली होती. यासोबतच उपेंद्र रावत यांनी निर्दोष सिद्ध होईपर्यंत सार्वजनिक जीवनात कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेहीम्हटले होते.
राजराणी रावत यांच्यावर पक्षाने दाखवला विश्वास BJP Candidate List ।
उपेंद्र सिंह रावत सध्या बाराबंकी मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. त्यांना याच ठिकाणावरून पुन्हा पक्षाचे उमेदवार बनवण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या जागी भाजपने आपला उमेदवार बदलत राजराणी रावत यांच्यावर विश्वास व्यक्त केलाय.
कोणतीही निवडणूक लढवणार नाही BJP Candidate List ।
निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा करताना उपेंद्र सिंह रावत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले होते, “माझा एक संपादित व्हिडिओ व्हायरल केला जात आहे, जो डीपफेक एआय तंत्रज्ञानाने तयार केला आहे, ज्यासाठी मी एफआयआर दाखल केली आहे. या संदर्भात, मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. मी निर्दोष सिद्ध होईपर्यंत सार्वजनिक जीवनात कोणतीही निवडणूक लढवणार नाही.
नुकतेच भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या १९५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत उपेंद्र रावत यांचेही नाव होते. पक्षाने त्यांना बाराबंकीमधून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. पण नाव जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा एक कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर तो वादात सापडला. त्याचवेळी खासदार प्रतिनिधी दिनेश चंद्र रावत यांनीही या कथित अश्लील व्हिडिओबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.