Pallavi Dempo । भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी काल जाहीर केली. पाचव्या यादीत 111 नावे आहेत. यामध्ये अनेक प्रसिद्ध नावांचाही समावेश आहे. भाजपने प्रथमच गोव्यातून एका महिला उमेदवाराला तिकीट दिलंय. भाजपने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी दिली. या जागेवरून भाजपने आतापर्यंत केवळ दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. या जागेवर भाजपने ज्या पल्लवी डेम्पो याना उमेदवारी दिली त्या नेमक्या कोण आहे? हे जाणून घेऊ…
पल्लवी डेम्पो कोण आहे? Pallavi Dempo ।
पल्लवी डेम्पो या एक महिला उद्योगपती आहेत. ज्या शिक्षण आणि मीडिया क्षेत्रात व्यवसाय करतात. सध्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्डिन्हा खासदार आहेत. पल्लवीचे पती श्रीनिवास डेम्पो हे देखील गोव्यातील लोकप्रिय व्यापारी आहेत. ते गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्षही आहेत. पल्लवी डेम्पो या एक शिक्षणतज्ज्ञ आहेत. पल्लवी इंडस्ट्रीजमध्ये मीडिया आणि रिअल इस्टेट क्षेत्र हाताळते.
पल्लवी धेंपो 49 वर्षांच्या आहेत. त्यांनी रसायनशास्त्रात पदवी घेतली आहे. यासोबतच त्यांनी एमआयटी पुणे येथून एमबीएची पदवीही घेतलीय. पल्लवी डेम्पो हे गोव्यातही खूप लोकप्रिय नाव आहे. डेम्पो कुटुंब गोव्यात मुलींना शिक्षण देण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवते. या कुटुंबाने ग्रामीण शाळा दत्तक कार्यक्रमांतर्गत सरकारी हायस्कूल दत्तक घेतलंय.
इंडो-जर्मन एज्युकेशनल अँड कल्चरल सोसायटीच्या अध्यक्षा Pallavi Dempo ।
पल्लवी डेम्पो या इंडो-जर्मन एज्युकेशनल अँड कल्चरल सोसायटीच्या अध्यक्षा देखील आहेत. जे जर्मनी आणि गोवा यांच्यातील सांस्कृतिक संवर्धनासाठी योगदान देतात. याशिवाय त्या गोवा मोडा फाउंडेशनच्या विश्वस्तही आहेत. पल्लवी गोवा कॅन्सर सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीसह भारतीय व्यवस्थापन संघटनेच्या महिला परिषदेच्या कोअर कमिटीची सदस्य आहे. त्या गोवा विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेच्या सदस्याही होत्या.
याशिवाय भाजपने आपल्या १११ उमेदवारांच्या यादीत अनेक लोकप्रिय उमेदवार उभे केले आहेत. भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौतला उमेदवारी दिली असून पिलीभीतचे खासदार वरुण गांधी यांचे तिकीट रद्द केले आहे. मात्र त्यांची आई मनेका गांधी यांना सुलतानपूरमधून पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.