ICC ODI World Cup 2023 India vs South Africa Virat Kohli Birthday : विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत भारत पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. (WorldCup 2023)
विराट कोहलीने (Virat Kohali) 67 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने त्याच्या वाढदिवशी शानदार खेळी केली आहे आणि कठीण खेळपट्टीवर टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणलं आहे. त्याने अय्यरसोबत शानदार भागीदारी केली. 30 षटकांनंतर भारताची धावसंख्या 2 बाद 179 आहे.यानिमित्त आपण अशा भारतीय खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या जन्म दिवशी तब्बल 50+ रन्सची जबरदस्त बॅटींग केली आहे.
विराट कोहलीने वाढदिवसाच्या दिवशी अर्धशतक झळकावले. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या वाढदिवशी 50+ धावा करणारा तो सहावा भारतीय ठरला आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, नवज्योत सिंग सिद्धू, इशान किशन, युसूफ पठाण यांनी ही कामगिरी केली आहे.
भारतासाठी त्यांच्या वाढदिवशी ODI 50+ धावा करणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर (134) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह, 1998 (25 वा वाढदिवस)
विनोद कांबळी (100*) विरुद्ध इंग्लंड, जयपूर, 1993 (21 वा वाढदिवस)
नवज्योतसिंग सिद्धू (65*) विरुद्ध वेस्ट इंडिज, मुंबई, 1994 (31 वा वाढदिवस)
इशान किशन (59) वि. श्रीलंका, कोलंबो, 2021 (23 वा वाढदिवस)
युसूफ पठाण (50*) विरुद्ध इंग्लंड, इंदूर, 2008 (26 वा वाढदिवस)
विराट कोहली (50*) वि दक्षिण आफ्रिका, कोलकाता, 2023 (35 वा वाढदिवस)
विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीनंतर आता क्रिकेट चाहत्यांना त्याच्या शतकाची विशेष म्हणजे 49 शतकाची प्रतीक्षा आहे. सचिन तेंडुलकरच्या वनडेतील 49 शतकाच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून तो एक शतक दूर आहे. विराटने त्याच्या वाढदिवशी या विक्रमाशी बरोबरी केली तर चाहत्यांसाठी ती भेटवस्तूपेक्षा कमी नसेल. विराटच्या नावावर आतापर्यंत 48 वनडे शतके आहेत.