ICC ODI World Cup 2023 India vs South Africa Virat Kohli Birthday : : विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत भारत पहिल्या तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील.
कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.भारताने प्लेइंग-11 मध्ये एकही बदल केला नाही. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीच्या जागी फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीचा संघात समावेश केला.
IND Vs SA Live Score : आज भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा वाढदिवस आहे. विराट 35 वर्षांचा झाला आहे आणि आज वाढदिवशी विराटनं दक्षिण आफ्रिकेविरूध्द शानदार शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या वनडेतील 49 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. सध्या 48.3 षटकांनंतर भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 306धावा इतकी झाली आहे. सध्या विराट कोहली नाबाद 100*(119) आणि रविंद्र जडेजा 11*(8) धावांवर क्रीजवर आहे.
वनडेत सर्वाधिक शतके…
विराट कोहली (277 डाव) – 49 शतके
सचिन तेंडुलकर (452 डाव) – 49 शतके
रोहित शर्मा (251 डाव) – 31 शतके
रिकी पाँटिंग (365 डाव) – 30 शतके
सनथ जयसूर्या (433 डाव) – 28 शतके
विराट कोहलीचे शतक…
विराट कोहलीने 119 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते. या बाबतीत त्याने महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. सचिनने वनडेमध्ये 49 शतके झळकावली आहेत. सचिनने 452 एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती, तर विराटने 277 व्या एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली आहेत. यात विशेष म्हणजे आज वाढदिवसाच्या दिवशी त्याने शतक झळकावून विक्रमाची बरोबरी केली. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले.