नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार दिल्लीत पुन्हा पाच साल केजरीवाल असे चित्र निकालातून पुढे येणार का, याविषयी मोठी उत्सुकता आहे.
राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी दिल्ली सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (आप) सत्ता राखणार असल्याचे चित्र प्रारंभीपासूनच राहिले.
दरम्यान, निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना दिल्लीत तिसऱ्यांचा आम आदमी पक्षाची सत्ता आणून वाढदिवसाचे ‘गिफ्ट’ देणार असे दिसते आहे. आज दिल्लीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून आजच सुनीता केजरीवाल यांचा वाढदिवसही आहे. काही तासात भाजप आणि आम आदमी पार्टीने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.