पाटना – बिहारमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हे मृत्यू कसे झाले याबाबत मात्र अजून गूढ कायम आहे. चंपारण्यमधील हूच भागात गेल्या दोन ते तीन दिवसांत हे मृत्यू झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Bihar | We have been told that around 8 people died mysteriously at a village (in West Champaran) in the past 2-3 days. Their family members & villagers have not mentioned alcohol consumption. FIR has been lodged and the probe is underway: DM Kundan Kumar pic.twitter.com/DbsRIlLujp
— ANI (@ANI) July 16, 2021
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी FIR दाखल करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिकारी याबाबत सखोर तपास करत आहेत.
The investigation is underway. Officers concerned are working on it. The locals are not ready to talk about it. We are closely monitoring the situation: Bihar Deputy CM Renu Devi on the deaths of 8 people at a village in West Champaran pic.twitter.com/PdpMTGSZ1E
— ANI (@ANI) July 16, 2021
या दुर्घटनेतील मृतांचे मृतदेहांवर अंतिम संस्कार गावकऱ्यांनी करुन टाकले आहे. त्यामुळे अचानकच झालेल्या 16 मृत्यूंचं रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे.
या घटनेबाबत बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी म्हणाल्या की, गावातील स्थानिक लोक यासंदर्भात बोलायला तयार नाहीयेत. आम्ही सध्य परिस्थितीचा बारकाईने आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.