‘बिग बॉस14’ची क्रू मेंबर ‘पिस्ता धाकड’चा व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून दुदैवी मृत्यू

मुंबई – कलर्स हिंदी वाहिनीवरील बहुचर्चित आणि प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या सेटवरून मोठी बातमी येत आहे. ‘बिग बॉस शो’च्या टॅलेंट मॅनेजरचं नुकतंच निधन झालं आहे. ‘पिस्ता धाकड’ असं तिचं नाव असून अवघ्या 23व्या वर्षी तिने सिनेसृष्टीतून एक्झिट घेतली आहे.

पिस्ता धाकड च्या अश्या अचानक जाण्याने बिग बॉसच्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला आहे. सध्या बिग बॉसच्या संपूर्ण टीमवर शोककळा पसरी असून, स्पर्धकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये झालेल्या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बिग बॉस शोच्या सेटबाहेरच हा अपघात झाल्याची माहिती समजत आहे. 15 जानेवारी रोजी पिस्ता फिल्मसिटीमध्ये सेटवर सलमान खानसोबत ‘विकेंड का वार’ या एपिसोडचं शूटींग करून तिच्या दुचाकीने घरी जात होती. रात्रीच्या अंधारात तिची स्कुटी स्लिप होऊन रस्त्यावरच्या खड्ड्यात गेली आणि मागून आलेल्या व्हॅनिटी व्हॅनने तिला जागीच चिरडलं आणि तिच्या मृत्यू झाला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.