पुणे – कात्रज – देहुरोडवरील नऱ्हे आंबेगावच्या पेट्रोल पंपासमोर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.
ऑर्किड स्कूलच्या समोर हा अपघात घडला. या ट्रकची धडक इतकी भीषण होती की समोरील एक पिकअप टेम्पो थेट बाजूच्या चारीत कोसळून पडला.
सकाळी साडेदहाच्या दरम्यान कात्रज कडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून त्याने पुढील आठ ते नऊ वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत . या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. वाहने रस्त्यावर असल्याने एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे.
क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक आणि इतर वाहने उचलण्यास सुरुवात झाली असून याबाबत अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.