पिंपरी – आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेकडून शहर पातळीवर पक्षबांधणी सुरू झाली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होणारे तरुण मनसेकडे आकर्षित होत आहेत. पर्यायाने मनसेत प्रवेश करण्याकडे त्यांचा कल वाढू लागला आहे. भोसरी आणि चिंचवड विधानसभा अंतर्गत नुकताच कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. चऱ्होलीगाव येथील मनसे जनसंपर्क कार्यालयात भोसरी विधानसभा अंतर्गत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
विभाग अध्यक्ष अंकूश तापकीर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे चिखले यांनी स्वागत केले. रोहित गिरी, बालाजी पालकर, अमोल जाधव, जेम्स बनसोडे, राहुल गायकवाड, शिवम शिंदे, गणेश सावळे, विठ्ठल ढोणे, रोहित जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.
चिंचवड विधानसभा क्षेत्रातंर्गत राजू सावळे, मयूर चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. शहराध्यक्ष चिखले यांच्या निगडी येथील जनसंपर्क कार्यालयात किवळे गावातील कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे आदी उपस्थित होते.