मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत. धुळ्यात जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपाला २ जागांची गरज आहे. यातील १ जागा जिंकत भाजपाने विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असल्याचे दिसत आहे. भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कन्या धरती देवरे यांचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. त्यांच्या विजयाने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या. यावेळी धरती देवरे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान देण्यात आले. देवरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना पाटील यांचा पराभव केला आहे. धरती देवरे लामकाणी गटातून भाजपकडून निवडणूक लढवली.
धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. धुळे जिल्हा परिषदेच्या 15 गट व पंचायत समितीच्या 30 जागांसाठी पोटनिवडणूक 15 पैकी जिल्हा परिषदेची 1 जागा तर पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक -जिल्ह्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच प्रमुख लढत – शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र आली असून आघाडी ने एकत्रित उमेद्वार दिले आहेत. – कुसूंबा गट वगळता सर्व गटात महाविकासची आघाडी आहे. – कुसूंबा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी सह शिवसेनेने देखील आपला उमेदवार दिला आहे.
ओबीसी उमेदवार किती उभे रहाणार ? – भाजपने सर्व जागांवर OBC उमेदवार दिले आहेत. – काँग्रेस – 7 जागांवर उमेदवार – शिवसेना- 04 जागांवर – राष्ट्रवादी- 04 जागांवर कोणत्या पक्षानं किती महिला उमेदवार -भाजप ने 8 महिला उमेदवार दिल्या आहेत. -महाविकास आघाडी ने 9 जागांवर उमेदवार गेल्या अनेक वर्षांपासून काँगेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजप ने बहुमताने सत्ता काबीज केली आहे.