New Delhi – Patna Vande Bharat Train – दिवाळी आणि छठपूजेचा सण पाहता बिहारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने नवी दिल्ली ते पाटणा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची घोषणा केली आहे. रेल्वेने X वर ही माहिती दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वे प्रथमच नवी दिल्ली ते पाटणा असा सण विशेष वंदे भारत ट्रेन चालवत आहे.
नवी दिल्ली-पटणा वंदे भारत ट्रेन कधी धावेल?
वंदे भारत ट्रेन नवी दिल्ली ते पाटणा 11 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 वाजता सुटेल.
पाटणाहून नवी दिल्लीला येणारी वंदे भारत ट्रेन १२ नोव्हेंबर, १५ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता धावेल.
भाडे किती आहे आणि स्टॉप काय असणार ?
नवी दिल्ली ते पाटणा या वंदे भारत ट्रेनमध्ये चेअर कारचे भाडे 2355 रुपये आहे तर इकॉनॉमी कारचे भाडे 4410 रुपये आहे. नवी दिल्ली ते पाटणा या मार्गावर ही ट्रेन कानपूर सेंट्रल, प्रयागराज, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आराह स्टेशनवर थांबेल.
पाटणा ते नवी दिल्ली या वंदे भारत ट्रेनमध्ये चेअर कारचे भाडे 2355 रुपये आहे तर इकॉनॉमी कारचे भाडे 4410 रुपये आहे. पाटणा ते नवी दिल्ली या मार्गावर ही ट्रेन आरा, बक्सर, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, प्रयागराज, कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकांवर थांबेल.