Vande Bharat Express – वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली तेंव्हापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. अगोदर या रेल्वेगाडीच्या संदर्भात ज्या बातम्या येत होत्या त्यात खोडसाळपणाचा भाग म्हणून किंवा समाजकंटकांचे काम म्हणून काहीसे दुर्लक्ष केले जाऊ शकत होते.
मात्र आता ज्या घटना घडत आहेत त्यावरून हा खोडसाळपणाचा प्रकार आहे की कोणते कारस्थान असून त्यानुसार ही कृती केली जाते असा प्रश्न निर्माण होतो आहे. । Vande Bharat Express
हे सांगण्याचे कारण म्हणजे आज दोन राज्यांत चार ठिकाणी वंदे भारतवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात या घटना घडल्या आहेत आणि चार ठिकाणी गाडीवर दगडफेक झाली आहे.
त्यात गाडीच्या खिडक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दगडफेकीत कोणी प्रवासी जखमी झालेला नाही. ही गाडी सुरू झाल्याच्या काही दिवसांतच गुजरातमध्ये गाडीवर दगडफेकीची पहिली घटना घडली होती. त्यानंतर हा क्रम सुरूच राहीला आहे. । Vande Bharat Express