नवी दिल्ली – हमासविरुद्ध युद्ध पुकारलेल्या इस्रायलला शस्त्रे विकण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन दुसर् यांदा संसदेला डावलणार आहेत. इस्रायलला आपत्कालिन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठी बायडेन हे आपल्या विशेष अधिकारांचा वापर करणार आहेत. मात्र त्यांच्या या कृतीवर आंतरराष्ट्रीय समुदायातून मोठी टीका व्हायला लागली आहे.
इस्रायलला सुमारे १४७.५ दशलक्ष डॉलर किंमतीची शस्त्रे विकण्यासाठी आपत्कालिन निर्णय घेम्यात आला आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांनी संसदेला सांगितले. इस्रायलला पुरवल्या जाणार् या उपकरणांमध्ये १५५ एमएम तोफांचे गगोळे बनवण्यासाठी आवश्यक असलेले फ्युज, चार्जर्स आणि प्रायमरचा समावेश आहे. ही खरेदीची प्रक्रीया इस्रायलने यापूर्वीच पूर्ण केली आहे. इस्रायलला या लष्करी उपकरणांची तातडीने आवश्यकता असल्यामुले आपण आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून ही उपकरणे इस्रायलला विकण्याची अनुमती दिली असल्याचे ब्लिंकेन म्हणाले.
विदेशांना लष्करी उपकरणे विकण्यासाठी अमेरिकेच्या संसदेकडून संबंधित देशाच्या गरजेचा आढावा घेतला जात असतो. मात्र विशेष अधिकारांतर्गत संरक्षण मंत्री अध्यक्षांच्या अनुमतीने हा निर्णय घेऊ शकतात. ही स्थिती अगदी अपवादात्मक असते. मात्र आपत्कालिन स्थितीमध्ये हा निर्णय तातडीने घेण्यासाठी या प्रक्रियेचे बंधन नाही.
ब्लिंकेन यांनी ९ डिसेंबर रोजी असाच निर्णय घेतला होता. त्यावेळी १०६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या सुमारे १४ हजार तोफगोल्यांचा दारूगोळा इस्रायलला विकण्यास मान्यता दिली गेली होती.
इस्रायल आणि युक्रेन या दोन्ही युद्धाच्यावेळी अमेरिकेकडून मोठी मदत दिली गेली आहे. ही दोन्ही युद्धे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला दोका असल्यामुळे संबंधित देशांना मदत देणे आवश्यक असल्याचे बायडेन यांचे आतापर्यंतचे धोरण राहिले आहे.
इस्रायलने हमासचा २.७ दशलक्ष डॉलरचा निधी पकडला
हमासच्या टेरर फंडींगमद्ये सहभागी असलेल्या २१ पॅलेस्टिनींना इस्रायलने केलेल्या कारवाईमध्ये अटक केली आहे. जुदेआ आणि समारिया या शहरांमध्ये इस्रायली सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आणि २.७ लशलक्ष डॉलरचा निधी जप्त केला, असे इस्रायलच्या सैन्य दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. गाझामधील हमास आणि इस्लामिक जिहादला पैसे पाठवल्यामुळे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी हलहोल, बीत अल-मकदेस, अल-फखर, अल-अजोली आणि नूर अल-हदा या पाच परकीय चलन कार्यालयांना दहशतवादी संघटना म्हणून नियुक्त केल्यानंतर छापे टाकण्यात आले.