वॉशिंग्टन – काल देशभर साजरी करण्यात आलेल्या महावीर जयंतीच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जगात युद्धाचे वातावरण असताना अमेरिकेच्या अध्यक्षांकडून प्रेम, अहिंसा आणि शांततेसाठी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत, हे विशेष आहे. जिल आणि मी जैन धर्मियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो.
प्रेम, आनंद आणि सौहार्द पसरवून महावीरांच्या मूल्यांचा आदर यापुढेही केला जात रहावा, असे बायडेन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. महावीर जयंतीच्या निमित्ताने जैन समुदायाला शुभेच्छा देणारे ज्यो बायडेन हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष ठरले आहेत.