नवी दिल्ली – तो दिवस होता ३० डिसेंबर २०२२ चा. भारताचा आघाडीचा फलंदाज फलंदाज आपली दिल्लीतील कामे उरकून आईसोबत नववर्ष साजरे करण्यासाठी स्वतः त्याची ब्रँडेट कार चालवत दिल्ली- डेहराडून राष्ट्रीय महामार्गावरून निघाला. कारचा वेग अतिशय सुसाट होता. तितक्यात ऋषभ डोळा लागला आणि क्षणात होत्याचे नव्हतं झालं.
ऋषभची कार महामार्गावरील लेन सोडून भरकटली आहे अतिषय वेगात रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. अपघाताची भीषणता इतकी होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला व बघता-बघता या कारने पेटही घेतला. इतक्या भीषण अपघातानंतरही रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या ऋषभने समयसुचकता दाखवत कारची काच फोडली व तो कारबाहेर आला. जर त्यावेळेस तो जर काच तोडून बाहेर पडला नसता तर कदाचित तो वाचला नसता. आता या अपघाताची वर्षपूर्ती झाल्यानंतर ऋषभचा संघ सहकारी अक्षर पटेलने या भीषण अपघाताच्या आठवणींना दिल्ली कॅपिटल्सच्या एका व्हिडीओतून उजाळा दिला आहे.
365 Days since that fateful night.
Every day since then has been nothing but full of gratitude, belief, self-care, hardwork and a never-give-up approach towards making a roaring comeback in the game that runs thick through his veins 🫰🏻
Here’s to seeing the unorthodox,… pic.twitter.com/y5TD35RCrS
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 30, 2023
अक्षर या व्हिडिओत म्हणतो, सकाळी ७ किंवा ८ वाजता माझा फोन वाजला. प्रतिमा दीदीने मला हाक मारली व विचारले तूझे ऋषभशी शेवटचे कधी बोलने झाले होते? त्यावर, मी कालच करणार होतो पण काल करता आला नाही, असे उत्तरलो. तेव्हा प्रतिमा दीदीने म्हणाली की, त्याच्या आईचा नंबर असेल तर मला पाठवा, कारण ऋषभचा गंभीर अपघात झालेला आहे. हे शब्द ऐकून प्रथमदर्शनी मला ऋषभ भाई गेला असे वाटले, असे ऋषभने या व्हिडिओत म्हटले आहे.
अपघातानंतर पंतवर डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला यांच्या देखरेखीखाली मुंबईत शस्त्रक्रिया झाली, त्यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतच्या उजव्या गुडघ्यात तीन लिगामेंटवर उपचार केले. त्यानंतर २६ वर्षीय पंत आता या झपाट्याने बरा होत असून तो आगामी आयपीएलमध्ये एखाद्या तरी सामन्यात खेळेल अशी अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या मेगा लिलावात तो दिल्ली कॅपिटल्ससाठी बोली लावताना दिसला होता.
नववर्षात पंत पुनरागमन करेल- हुसेन
इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनने २०२४ मध्ये ऋषभ पंतच्या यशस्वी पुनरागमनासाठी आशा दर्शवली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकापूर्वी पंतचे क्रिकेटमध्ये पुनरागमन होण्याची अपेक्षा आहे. हुसेनने म्हटले आहे की, सोशल मीडियावर, मी बरे झाल्यानंतर त्याची सुरुवातीची पावले पाहिली आणि नंतर त्याचा जिममध्ये प्रशिक्षण आणि क्रिकेट खेळताना आणि रिकी पाँटिंगसोबतचा त्याचा फोटो पाहिला. अॅशेसमध्ये मी रिकीसोबत होतो आणि रिकीने तो कसा प्रगती करत आहे, याची माहिती मला दिली. तसेच तो ‘बॉक्स ऑफिस’ (हिट) क्रिकेटर आहे, अशी प्रतिक्रीया दिल्याचेही हुसेनने म्हटले आहे.