खडकवासला – गावठाणावरील बीडीपी रद्द करण्याचा ठराव मान्य करून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणाऱ्या भिमराव तापकीरांच्या (अण्णा) पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत, असा विश्वास वडगाव बुद्रूक पसिरातील बीडीपीग्रस्त नागरिकांनी व्यक्त केला.
खडकवासला मतदार संघातील महायुतीचे उमेदवार भिमराव तापकीर यांची पदयात्रा बुधवारी वडगाव बुद्रुक व आनंदनगर येथील परिसरात काढण्यात आली. यावेळी पदयात्रेचे नागरिकांनी उस्त्फूर्तपणे स्वागत केले.
याप्रसंगी नगरसेवक हरिदास चरवड, नीता दांगट, राजाभाऊ लायगुडे, राजश्री नवले, अश्विनी पोकळे, मंजूषा नागपुरे, ज्योती गोसावी, प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, दिलीपमामा चरवड, हेमंत दांगट, मनोहर बोधे, गंगाधर भंडावळे, नितीन वाघ, अमर चरवड, सचिन मोरे, जयसिंग दांगट, अमोल दांगट, संतोष गोपाळ, शहाजी वांजळे, माधव देशपांडे, बाळकृष्ण वांजळे, कल्पेश ओसवाल, सुप्रिया भूमकर, मनीष जगदाळे, प्रसाद गिजरे, पदयात्रेत सहभागी झाले होते.