पुणे – शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आणि कचऱ्याचा प्रश्न त्या-त्या भागातच मार्गी लावण्यासाठी विविध सोसायट्यांमध्ये लहान-मोठे कचरा प्रकल्प उभारले असून, याची व्याप्ती वाढविणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष आणि पर्वती विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
प्रचार फेरीच्या समारोपप्रसंगी त्यांनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी भाजप सरचिटणीस दीपक मिसाळ, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, बाळासाहेब ओसवाल, महेश वाबळे, साईदिशा माने, राजेद्र शिळीमकर, अर्जुन जानगवळी, मनोज पांडे, बाळासाहेब ढवळे, रवींद्र चव्हाण, प्रवीण दिवेकर, विशाल पवार, राहुल माने, बाबुराव घाटगे, अर्जुन भोकरे, योगेश वाबळे, करण देवेंद्र, प्रशांत थोपटे, राजेश चिटणीस, मंगेश शहाणे, सागर खोत, सचिन देडे, प्रशांत खवळे, गणेश लगस, रुपेश तुरू, सूरज खंडागळे, जयराम भोसले, प्रशांत थोपटे, सागर खोत, सुजय काळे, विजय बिबवे, बिपीन पोतनीस आदी उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांत कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशीन उपलब्ध करून दिल्याने 12 सोसायट्यांमध्ये प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला आहे. पु. ल. देशपांडे उद्यानात कचरा प्रक्रियाप्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. कचरा उचलणाऱ्या छोट्या गाड्या आणि ट्रक उपलब्ध करून दिल्याने कचरा संकलनाला वेग आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाने जनजागृती निर्माण झाली आहे, असेही मिसाळ म्हणाल्या. पर्वती दर्शन आणि सिंहगड रस्त्यावरील नवीन कचरा प्रकल्प मंजूर करून घेतला असून, त्याचे काम सुरू होत आहे.
वाडे, सोसायट्या, अपार्टमेंट्स येथे वापरता येतील अशी छोटी यंत्रे बसवणार आहोत. आगामी काळात कचरा संकलन, वर्गीकरण आणि त्याच्यावर प्रक्रिया करण्याबाबत प्रभावीपणे काम करणार आहे. तसेच प्लॅस्टिक कचरामुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जनजागृती मोहिमा हाती घेणार असल्याची ग्वाहीही मिसाळ यांनी दिली.