भिडे गुरुजींचे ‘यान’ आख्यान

सोलापूर (प्रतिनिधी) – अमेरिकेने भारतीय कालगणनेनुसार एकादशीला यान सोडल्याने ते यशस्वी झाल्याचे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर समाजमाध्यमातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेने आतापर्यंत 38 वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. तेव्हा नासाच्या शास्त्रज्ञाने भारतीय कालमापन पध्दतीचा अभ्यास केला. तेव्हा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.

अमेरिकेने यान सोडले त्या दिवशी एकादशी होती. त्या दिवशी नासाने उपग्रह सोडला. एकादशी दिवशी ब्रम्हांडातील स्थिती संतुलित असते, असेही त्यांनी म्हटले.

भारताच्या “चांद्रयान-2′ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची राजकिय वर्तुळात चर्चा होत आहे. सोलापुरात व्याख्यानासाठी आल्यानंतर रविवारी सायंकाळी ते बोलत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.