पुणे – जीवनसाथी डॉट कॉम वेबसाईटवर जोडीदार शोधणाऱ्या एका महिलेस 9 लाखाचा गंडा घालण्यात आला. विवाहाचे आमिष दाखवत रोख आणी धनादेश घेऊन तथाकथीत साथीदाराने पलायण केले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 34 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनूसार समीर जोशी उर्फ जगन्नाथ पाटकुले (रा.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी महिला एका बड्या कंपनीत टीम लिडर म्हणून कार्यरत आहे. तीने जीवनसाथी डॉट कॉमवर विवाहासाठी नोंदणी केली होती. तीच्या मोबाईलवर आरोपीने समीर जोशी नावाने संपर्क साधला. स्वत: मलेशीयातील एका बड्या कंपनीत कामाला असल्याचे सांगितले. यानंतर भारतात आल्याचे सांगत प्रत्यक्षात फिर्यादीची भेट घेतली.
फिर्यादीशी सातत्याने भेट घेत तीचा विश्वास संपादन करण्यात आला. यानंतर संगणक व ईतर साहित्य घेण्यासाठी फिर्यादीकडून रोख व धनादेश स्वरुपात तब्बल 9 लाखाची रक्कम वेळोवळी घेतली. त्यांच्या भेटीचा आणी पैशाचा व्यवहार फेब्रुवारी महिण्यापासून चालला होता. दरम्यान तब्बल नऊ लाखाची रक्कम घेतल्यावर आरोपी समीरने फिर्यादीशी संपर्क तोडला.
प्रथम त्याने फिर्यादीला व्हॉटस अपवर ब्लॉक केले. यानंतर त्यांचे कॉलही स्विकारने बंद केले. फिर्यादीला याचा संशय आल्याने त्यानी तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी केली असता, जगन्नाथ पाटकुले नावाच्या व्यक्तीने समीर जोशी नावावे प्रोफाईल बनवून फिर्यादीला गंडा घातल्याचे उघड झाले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास राऊत करत आहेत.