“साहो’च्या कमाईत घसरण सुरूच

ऍक्‍शन सीन्सचा भरमार असूनही प्रभास व श्रद्धा कपूरचा “साहो’ बॉक्‍स ऑफीसवर दणक्‍यात आपटताना दिसतो आहे. पहिल्या आठवड्यात चांगली कमाई करणारा हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात मात्र बॉक्‍स ऑफीसवर पार कोलमडलेला दिसून येतो आहे. कथा आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत कमकुवत ठरलेल्या “साहो’च्या कमाईत दुसऱ्या आठवड्यात तब्बल 80 टक्‍क्‍यांची घट झाली आहे.

प्रदर्शनानंतर पहिल्या आठवड्याच्या अखेर या चित्रपटाने 115 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. पण दुसरा आठवडा सुरू होताच कमाईचा आलेख खालच्या दिशेने जाऊ लागला. दुसऱ्या शुक्रवारी “साहो’ने फक्त 3.50 कोटी रुपये कमावले आहेत. पहिल्या आठवड्यात 79 कोटी रुपयांचा गल्ला जमवणाऱ्या “साहो’ने दुसऱ्या आठवड्यात फक्त 14.25 कोटी रुपयेच कमवू शकला.

“साहो’या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीतने प्रेक्षकांना चित्रपट पुन्हा एकदा पाहा अशी विनंती केली होती. मात्र चांगल्या कथेअभावी चित्रपटाचं बॉक्‍स ऑफीसवर टिकण अवघड आहे हे प्रेक्षकांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

साहो या चित्रपटापुर्वी कुमकूवत कथा आणि दिग्दर्शन असलेले “ट्यूबलाइट’, “झिरो’, “ठग्स ऑफ हिंदोस्तान’ असे मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट बॉक्‍स ऑफीसवर दणक्‍यात आपटलेले आहेत.

You might also like
1 Comment
  1. Sagar says

    Nice post i like Saaho movie ?
    Prabhas is best Actor

Leave A Reply

Your email address will not be published.

×