पेठ -सातगाव पठार भागातील कुरवंडी (ता. आंबेगाव) येथील दोन संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले असून, यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कुरवंडी गाव सात दिवसासाठी सील करण्यात आले असून, प्रशासन येथील घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. मुंबई येथून एक आजारी वृद्ध नातेवाइकांसह कुरवंडी गावात आला होता. त्याला उपचारासाठी मंचर येथे आणण्यात आले होते.
मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाला होता. या वृद्धाचा अंत्यविधी कुरवंडी गावात पार पडला. दशक्रियेच्या आदल्या दिवशी वृद्धाचा मुलगा करोना पॉझिटिव्ह आल्याची चर्चा सुरू झाली होती.
मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत कुरवंडी गावात धाव घेतली. ग्रामस्थांना समजावून गाव सील करण्यात आले. या वृद्धाला मुंबईहून घेऊन येणारे नातेवाइकांचा अहवालनिगेटिव्ह आला आहे,