..आणि अभिषेक बच्चनने मारली विवेक ओबेरॉयला मिठी

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेता विवेक ओबेरॉय एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. तिच्या या कामगिरीसाठी मुंबईमध्ये सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता.

या समारंभास अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्यात अमिताभ बच्चन हे अभिषेक बच्चनसोबत तेथे उपस्थित होते. तर, दुसरीकडे विवेक ओबेरॉय आणि त्याचे वडिल सुरेश ओबेरॉय व त्याची आणि पत्नी प्रियांकासोबत या कार्यक्रमला उपस्थित होता. सुरेश ओबेरॉययांनी अमिताभ यांना पाहताच मिठी मारली.

काही वेळानंतर अभिषेक आणि विवेक एकमेकांसमोर आले आणि त्यांनीदेखील एकमेकांना मिठी मारली आहे. त्या दोघांची मिठी चाहत्यांसाठी सुखद धक्‍काच होता. आता विवेक आणि अभिषेक जुने वाद विसरून त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण करणाक का असा प्रश्‍न चाहत्यांना पडला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)