पॅरिस – भारताची ऑलिम्पिकपटू तलवारबाजीतील खेळाडू भवानीदेवी हिने फ्रान्समध्ये झालेल्या शेर्व्हिले राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
महिलांच्या वैयक्तिक गटात विजेतेपद मिळवणाऱ्या भवानीदेवीचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतरचे पहिलेच विजेतेपद आहे. टोकियोत तिला पदकाची संधी गमवावी लागली होती. मात्र, या स्पर्धेत तिने आपल्या दर्जाला साजेसा खेळ केला.
जागतिक क्रमवारीत भवानी 50 व्या स्थानावर असून भारतीय क्रमवारीत ती अग्रस्थानी आहे. पुढील वर्षी होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी ती जगभरात होत असलेल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहे.