मुंबई – करोना काळात बंद पडलेली चित्रपटगृहे आता सुरू झाली आहेत. चित्रपटांसह आता चाहत्यांना विश्वकरंडक टी-20 स्पर्धेतील भारतीय संघाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपणही पाहता येणार आहे.
पीव्हीआर सिनेमा कंपनीने नुकताच याबाबत आयसीसीशी करार केला असून त्याच अंतर्गत राजधानी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद व पुणे या चार शहरांमधील पीव्हीआर चित्रपटगृहात भारताच्या सर्व सामन्यांसह उपांत्य लढती व अंतिम लढतींचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
भारताच्या सर्व सामन्यांची तिकिटे संपली असली तरी चित्रपटगृहात जाऊन हे सामने पाहण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली आहे. देशातील जवळपास 76 पीव्हीआर चित्रपटगृहात सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.