Bhanu Pratap Verma। भारतीय जनता पक्ष (भाजप) ने लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत अनेक जुन्या खासदारांची तिकिटे रद्द करून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या सगळ्यात काही नावं अशी आहेत की ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा विश्वास ठेवत यंदाचा निवडणुकीच्या मैदानात पुन्हा उतरवलंय.
उत्तर प्रदेशातील जालौन लोकसभा मतदारसंघातील भानु प्रताप वर्मा यांचाही अशाच नावांमध्ये समावेश आहे ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींनी यंदादेखील विश्वास ठेवलाय. सध्या ते केंद्रीय राज्यमंत्री आहेत. भानू प्रताप हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघातून ५ वेळा खासदार झाले असून त्यांना पक्षाने आता सहाव्यांदा तिकीट दिलंय.
भानु प्रताप वर्मा पहिल्यांदा खासदार कधी झाले ? Bhanu Pratap Verma।
1991 च्या प्रभू श्रीरामाच्या लाटेनंतर भानू प्रताप 1996 मध्ये पहिल्यांदा या जागेवरून खासदार झाले. त्यानंतर 1998 मध्येही भाजपने त्यांना तिकीट दिले आणि ते पुन्हा विजयी झाले. 2009 मध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला असला तरी पक्षाने भानू प्रताप यांच्यावर विश्वास कायम ठेवला. 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आणि ते विजयी झाले. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. अशा प्रकारे ते एकूण 5 वेळा खासदार झाले आणि पक्षाचा पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास बसला आहे.
आमदार म्हणूनही निवडून आले Bhanu Pratap Verma।
भानू प्रताप कोंछ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून एकदा आमदार देखील राहिले आहेत. केंद्र सरकारमध्ये प्रथमच त्यांना लघु, सूक्ष्म आणि उद्योग मंत्रालयात राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. नगरपालिकेत नगरसेवकापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली.
भानू प्रताप यांचा जन्म १५ जुलै १९५७ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुमेर सिंह आणि आईचे नाव सुमित्रा देवी आहे. पदव्युत्तर शिक्षणासोबतच त्यांनी एलएलबीची पदवीही मिळवलीय. 1988 मध्ये कोंच नगरपालिकेतून ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1991 मध्ये ते याच विधानसभेतून आमदार झाले.