नवी दिल्ली – अयोध्येतील राम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमीत्ताने आम आदमी पार्टीनेही ममोठ्या प्रमाणावर दिल्लीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पक्षातर्फे सोमवारी दिल्लीत “शोभा यात्रा” काढली जाणार असून त्यानंतर संपुर्ण शहरभर भंडारा म्हणजेच महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
शोभा यात्रेत आप पक्षाचे सर्व वरीष्ठ नेते सहभागी होणार आहेत. सध्या दिल्लीत आम आदमी पक्ष आयोजित रामलिला कार्यक्रम सुरू आहे. ही रामलिला तिन दिवस चालणार आहे. त्याला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राम हा कोणा एका राजकीय पक्षाचा विषय नसून तो सर्वांच्याच श्रद्धेचा विषय आहे असे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. अशा स्वरूपाच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आम आदमी पक्षाने पक्षातच एका वेगळ्या संघटनेची स्थापना केली आहे.