मुंबई : अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. राजकीय टीकाही त्या करताना दिससात. त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावं लागतं. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी फडणवीसांच्या काळात पोलीसांच्या बँक खात्यांवरून निशाला साधला होता. त्यावर अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख करत संताप व्यक्त केला होता. त्यांच्या संतप्त प्रतिक्रियेला भाई जगताप यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाचा आधारावर वर्ग केली होती. याच उत्तर द्यावं, असा सावाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. या प्रश्वाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप म्हटलं होतं की, सरळ रस्त्याने चालणाऱ्याला डिवचायचे नाही.
दरम्यान जगताप यांनी खोचक टीका करताना म्हटलं की, अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून एक लक्षात आलं की, खरं किती टोचतं. मी केवळ सवाल केला होता की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची बायको काम करत असलेल्या बँकेत पोलिसांची खाती कशाच्या आधारावर वर्ग करण्यात आली ? ते जनतेसमोर यावं. याला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी जी भाषा वापरली त्यावरून सत्य किती टोचत हे समोर आलं आहे, असं म्हणत भाई जगताप यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.