शिक्रापूर-आरणगाव (ता. शिरूर) येथील एका व्यक्तीच्या दारातून एक युवक गाडी चालवित गेला असता त्याचा राग मनात धरून युवकाला मारहाण करीत युवकाच्या घरातील महिलेचा विनयभंग करण्यात आला. शिक्रापूर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला आहे. सागर हिरामण भालेराव, रोमा विशाल भालेराव, राहुल बाळू भालेराव, संतोष बाळू भालेराव, विशाल हिरामण भालेराव, वंदना हिरामण भालेराव (सर्व रा. आरणगाव, ता. शिरूर), असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
आरणगाव हिरामण भालेराव यांच्या दारातून एका युवकाने दुचाकी घेऊन गेली. हिरामण यांच्या घरातील काही व्यक्तींनी युवकाला शिवीगाळ केली. यावेळी युवकाने गाडी थांबवित शिव्या देऊ नका, असे सांगितले. सागर भालेराव याने युवकाला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली.
त्यांनतर युवक पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेला असताना मारहाण करणाऱ्यांसह सागर भालेराव, रोमा भालेराव, राहुल भालेराव, संतोष भालेराव, विशाल भालेराव यांनी युवकाच्या घरामध्ये जाऊन महिलेकडे युवकाबाबत विचारणा केली. महिलेने मला माहित नाही, असे सांगितल्याने तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश डुकले करीत आहेत.