लहान मुलाला मारहाण; जय श्रीराम म्हणायला लावले

स्थानिक नेत्यासह तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा

दक्षिण कन्नड (कर्नाटक) – एका अल्पवयीन मुलाला मारहाण करून त्याला जय श्रीराम म्हणायला लावल्याबद्दल बजरंग दलाच्या स्थानिक नेत्यासह तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.

धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या बानतवाल तालुक्‍यात हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. मात्र, त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाल्याने त्या मुलाने पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून विठ्ठल पोलीस ठाण्यात बजरंग दलाचा नेता दिनेश आणि अन्य तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंदवण्यात आला. हा मुलगा कुडतामेगुरू या गावातील आहे.

तो आपल्या शाळेच्या पटांगणात खेळत असताना दिनेश आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी त्याला मारहाण केली. त्याला धमकावत जय श्रीराम असे म्हणायला भाग पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच्या खिशातील पैसेही या चौघांनी काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.