दारूला पैसे न दिल्याने व्यापाऱ्यास मारहाण

नगर – दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून दोघांनी व्यापाऱ्यास लाकडी दांडक्‍याने मारहाण करू मोबाइल व दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान केले. जूना दाणे डबरा येथील अंबिका गुड्‌स ट्रान्सपोर्ट येथे ही घटना घडली होती. याप्रकरणी तोफखाणा पोलिस ठाण्यात सलमान उर्फ मायकल बाबा शेख रा. बेलदार गल्ली, नगर ) व त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्‍तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी कि, अंबिका गुड्‌स ट्रान्सपोर्टचे मालक महेंद्र कांतीलाल भंडारी हे दुकानात असतांना सलमान तेथे आला. त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. भंडारी यांनी पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रागावलेल्या शेख व त्यांच्या साथीदाराने शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्‍याने मारहान केली. तसेच हातातील मोबाइल खाली पाडून नूकसान केले. दूकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. या मारहाणीत भंडारी जखमी झाले असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. या मारहाणीमुळे बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात महेंद्र भंडारी यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. उपनिरीक्षक घायवट करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.