पिंपरी – दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणास दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी लांडेवाडी, भोसरी येथे घडली.
शकील खाजाभाई काझी (वय 31) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. विपुल विश्वानाथ गौड (वय 28, दोघेही रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी शनिवारी (दि. 25) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपी काझी याने फिर्यादी गौड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र गौड यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी गौड यांना मारहाण केली.