बारामती(प्रतिनिधी) – शहरातील जलशुध्दीकरण केंद्रात झालेला तांत्रिक बिघाड व साठवण तलावातील अपुरा पाणीसाठा यामुळे शनिवारी (दि. 14) व सोमवारी (दि. 16) बारामतीकरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Pune : तब्बल 24 वर्षांनी ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’ची होणार निवडणूक
शनिवार व सोमवार दरम्यान म्हणजेच रविवारी (दि. 15) पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर मंगळवार (ता. 17) पासून पिण्याचा पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी या बदलाची नोंद घेत आवश्यक पाणी साठा करुन ठेवावे असे आवाहन देखील मुख्याधिकारी रोकडे यांनी केले आहे.