बारामती (प्रतिनिधी) – बारामतीत वाढत्या रुग्ण संख्येमुळे सोमवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने घेतला आहे. बारामतीतील दुकाने सोमवारी उघडण्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला होता मात्र कोरणा ची वाढती परिस्थिती व गांभीर्य पाहता त्यांनी निर्णय मागे घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून बारामतीत वाढत असलेले करोना रुग्ण संख्या बघता आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे त्या पार्श्वभूमीवर , सोमवार दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी पुढील निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी आप आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी नियमानुसार परवानगी असलेले व्यवसाय फक्त चालू राहतील.
सर्वांनी सरकारने दिलेल्या कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे पालन करावे. तसेच आपल्या कर्मचारी आणि ग्राहक यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन बारामती व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.