IPL 2021 : राणा-त्रिपाठी यांची अर्धशतके; कोलकात्याचे हैद्राबादसमोर विजयासाठी 188 धावांचे आव्हान

चेन्नई –  सलामीवीर नितेश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजयासाठी सनरायजर्स हैद्राबादसमोर 188 धावांचे आव्हान ठेवले.

नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या कोलकाता संघाने आक्रमक सुरुवात केली. नितेश राणा आणि शुभमन गिलने जोडीने ७ षटकांत ५३ धावांची सलामी दिली. मात्र फिरकीपटू राशिद खानने गिलला बाद करत सलामीजोडी तोडली. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने राणाला सुरेख साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. राहुलने अर्धशतक पूर्ण केले. त्याने २९ चेंडूत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याला टी. नटराजनने तंबूत धाडले. मात्र राणाने धडाकेबाज फलंदाजी करत धावफलक हालता ठेवला. त्याने ५६ चेंडूत चार षटकार आणि ९ चौकार लगावत ८० धावा केल्या. मोहम्मद नबीच्या चेंडूवर तो बाद झाला.

दरम्यान इयॉन मॉर्गन (2) आणि आंद्रे रसेल (5) झटपट बाद झाले. त्यानंतर दिनेश कार्तिकने नाबाद 22 धावा केल्या. तर शकीब अल हसनने (3) धावा केल्या. हैद्राबादकडून मोहम्मद नबी आणि राशीद खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.