IPL 2024 & England Players : आयपीएल 2024 मध्ये खेळणारे इंग्लंडचे खेळाडू चालू हंगामातील प्लेऑफ आणि फायनलमध्ये त्यांच्या संघांचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. इंग्लंडचे खेळाडू सध्या आयपीएलमध्ये आपापल्या फ्रँचायझींसाठी खेळत आहेत. मात्र, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) संघाचे खेळाडू बाद फेरीसाठी अनुपलब्ध घोषित केले आहेत. इंग्लंडने मंगळवारी T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये IPL खेळणाऱ्या काही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
वर्ल्डकपच्या तयारीसाठी बोलावले स्वदेशी…
ECB ने विश्वचषकापूर्वी 22 मे पासून पाकिस्तान विरुद्धच्या चार सामन्यांच्या T20 मालिकेपूर्वी सर्व खेळाडूंना घरी बोलावले आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ईसीबीच्या या निर्णयामुळे जोस बटलर, फिल सॉल्ट आणि मोईन अली यांना परतावे लागणार आहे.
बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, सॉल्ट कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि मोईन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळतो. KKR, राजस्थान आणि CSK हे सर्व प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, त्यामुळे प्लेऑफसाठी या खेळाडूंची उपलब्धता न होणे त्यांच्या संघांसाठी अडचणीचे ठरू शकते.
Jofra Archer is 🔙
Defending champions England have announced their ICC Men’s #T20WorldCup 2024 squad 👉 https://t.co/KM0nCSDLA1 pic.twitter.com/F6P9sVo3qP
— ICC (@ICC) April 30, 2024
इंग्लंडच्या पुरुष संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी T20 विश्वचषकासाठी निवडलेल्या खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांना निवडीबाबत माहिती दिली. हे खेळाडू बाद फेरीसाठी उपलब्ध नसल्याची माहितीही त्यांनी दिली. आयपीएल 2024 च्या प्लेऑफचे सामने 21 ते 26 मे दरम्यान होतील. बटलर, सॉल्ट आणि मोईन यांच्या व्यतिरिक्त, इंग्लंडच्या विश्वचषक संघात जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, विल जॅक आणि रीस टोपले यांचाही समावेश आहे आणि हे खेळाडू देखील आयपीएलचा भाग आहेत.1
18-19 मे पर्यंत परत जाऊ शकतात खेळाडू…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंडचे सर्व खेळाडू 18-19 मे पर्यंत मायदेशी परततील. असे झाल्यास इंग्लंडचा एकही खेळाडू प्लेऑफसाठी उपलब्ध होणार नाही. आयपीएलचा ग्रुप स्टेज 19 मेपर्यंत सुरू राहणार आहे.
मंगळवारी संघ जाहीर झाल्यानंतर रॉब म्हणाले की, तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय खेळाडूंना परत बोलावू शकत नाही. याचे एक कारण म्हणजे खेळाडूंची सुरक्षा. बटलरने आयपीएल संपण्यापूर्वीच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. मी त्याला सांगितले की, तुला पाकिस्तानविरुद्धची मालिका कर्णधार म्हणून खेळायची आहे आणि तो म्हणाला की त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसह टी-20 विश्वचषकाची तयारी करायची आहे.