Vijay Shivatare । राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष काम करताना दिसून येत्यातेय. त्यातच राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, या मतदार संघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर टीका केलीय.
बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. यामुळे बारामतीमध्ये पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केलाय.
पवार कुटुंबियांनाच का मतदान करावे? Vijay Shivatare ।
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात आरपारची लढाई लढण्याची घोषणा केली. आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावे. बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही, असे वक्तव्य करत विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच अजित पवार यांनी केलेली टीका ही माझ्यावर केली नाही तर ती संपूर्ण पुरंदरवर केली असल्याचेही त्यांनी म्हटले.
“तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ? Vijay Shivatare ।
राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी आव्हान देऊन २०१९ च्या निवडणुकीत पराभूत केले होते. त्यावेळी विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका करायला सुरूवात केली होती. त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते. त्यांनी शिवतारे यांना चँलेज दिले. अजित पवार म्हणाले होते की, “तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही.” त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. यामुळे विजय शिवतारे त्या पराभवाचा वाचपा बारामती लोकसभा मतदार संघात काढणार असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.