जामखेड : रत्नदीप मेडिकल फौंडेशनचा संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या संस्थेत हरीण पाळले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात वनविभागाच्या वतीने भारतीय वन्यजीव १९७२ अन्वये गुन्हा दाखल करुन जखमी हरणास शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल दि ९ मार्च रोजी विद्यापीठाची कमीटी तपासासाठी आली असता याच दरम्यान काॅलेजमध्ये दोन हरीण व्हीडिओमध्ये आढळून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तोच धागा पकडून यातील काही आंदोलन कर्त्यांनी कॉलेजच्या एका खोलीमध्ये हरीण असल्याचा संशय व्यक्त केला होता. परंतु कमीटीचा तपास चालू असल्याने या गोष्टीकडे कोणीही लक्ष दिले नाही.
त्यानंतर आज दि १० मार्च रोजी वनविभागाचे वनसेवक तहेरभाई सय्यद यांना एका व्यक्तीचा फोन आला की, एक हरीण रत्नदीप मेडिकलच्या आवारात जखमी असलेले आढळून आले आहे. त्यानंतर जखमी अवस्थेतील हरणास जामखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, श्रीधर सिध्देश्वर, आकाश घागरे, यावेळी हरण दोन्ही पायांनी जखमी झाले होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खेत्रे यांनी सदर हरणावर उपचार केले.
जामखेड येथील वनसंरक्षक तेलंगे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर शेळके व त्यांच्या पथकाने आंदोलन कर्त्यांसमवेत रत्नदीप कॉलेजमधील सदर खोलीची तपासणी केली. तेव्हा त्याठिकाणी हरणाची विष्ठा आढळून आली त्यावरुन ताब्यात घेतलेले हरीण याच खोलीत ठेवले असल्याचे निदर्शनास आले.
या सर्व बाबीवरुन व आंदोलन कर्त्यांनी दिलेल्या व्हीडिओमधील हरीण व सापडलेले हरीण एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानुसार रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांचेवर भारतीय वन्यजीव १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशीमाहिती कर्जत जामखेड चे वनपरिक्षेत्राचे अधिकारी मोहन शेळके यांनी दिली आहे.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, वनरक्षक एन यु तेलंगे, प्रविण उबाळे, एस. ए सपकाळ, कर्मचारी ताहेभाई सय्यद, एस.पी डोंगरे, एस.व्ही चिलगर, एस.एन नेहरकर, आर.एस सुरवसे, एस.के सुर्यवंशी व एच .के. माळशिकारे या पथकाने सदर कारवाई केली आहे.