Congress party Bank accounts frozen – सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड घटनाविरोधी ठरवत रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आल्याचा धक्कादायक दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेससोबतच युवक काँग्रेसची खातीही गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्षाचे खजिनदार अजय माकन यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत. अजय माकन यांनी दावा केला की, ते कर्मचाऱ्यांचे पगार काढू शकत नाहीत आणि बिलेही देऊ शकत नाहीत.
अजय माकन म्हणाले, देशातील लोकशाही गोठली आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला अवघे काही आठवडे उरले आहेत, मग हे पाऊल उचलून सरकारला काय सिद्ध करायचे आहे? आमच्या खात्यातील क्राउडफंडिंगचे पैसे गोठवण्यात आले आहेत.
2018-19 च्या आयकर भरण्याच्या आधारावर कोट्यवधी रुपयांची मागणी केली जात आहे. ही अत्यंत लाजिरवाणी, लोकशाहीची हत्या आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आमची खाती गोठवण्यात आली आहेत. काँग्रेस पक्ष सदस्यत्व मोहिमेद्वारे युवक काँग्रेसकडून पैसे जमा करतो आणि तेही गोठवले गेले आहेत.
पक्षाने विवरणपत्र भरण्यास उशीर केला. मात्र आणखी 45 दिवसांची मुदत देण्यात आली होती. याचा अर्थ खातेच गोठवले जावे असा नाही. सर्व काही प्रभावित झाले असून त्यांच्याकडे वीज बिल आणि पगार भरण्यासाठी पैसे नाहीत. बँकेत पैसे जमा करता येत नाहीत. बँकेतून पैसेही काढता येत नाहीत.
२१० कोटींची रक्कम गोठविली
युवक काँग्रेसची खातीही काल संध्याकाळी गोठवली आहे. त्यातून २१० कोटींची एकूण रिकव्हरी प्राप्तिकर खात्याने मागितली आहे. हे कुठल्या बलाढ्य उद्योगपती किंवा कॉर्पोरेट टॅक्सचे पैसे नाही. हे पैसे आम्ही ऑनलाइन क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून गोळा केलेले आहेत. या पैशातील ९५ टक्क्यांहून जास्त रक्कम १०० रुपयांपेक्षाही कमी स्वरुपात यूपीआयच्या माध्यमातून लोकांनी जमा केली आहे. युथ काँग्रेसच्या सदस्यत्वासाठीच्या शुल्क स्वरुपात गोळा झालेला पैसा युवक काँग्रेसच्या खात्यांमध्ये आहे. तो पैसा प्राप्तिकर विभागाने गोठवला आहे.
“एसटी प्रवर्गातून धनगर आरक्षण देण्यास नकार..” मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका