Jitendra Awhad VS Ajit Pawar । राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहे. शिवसेनेप्रमाणे त्यांच्यात देखील राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह असा वाद पाहायला मिळत असून, दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.
मात्र, यामध्ये खास करून आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. आज पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ( Jitendra Awhad VS Ajit Pawar )
“भाषणाची वेळ आली की नेमके तुम्ही बाथरुममध्ये असायचे. कारण तुम्हाला हिंदी बोलायला येत नाही. इंग्रजी बोलता येत नाही.’ असं आव्हाड यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “भाषणं करायला अभ्यास लागतो. भाषणं करायला माहिती लागते. मांडणी लागते.
ते विरोधी बाकावर येऊन भाषणं करायचे. काय भाषणं करायचे? तुमचा पीए लिहून द्यायचा. तुम्ही तर स्टेजवरुन नेहमी पळून जायचे. भाषणाची वेळ आली की नेमके तुम्ही बाथरुममध्ये असायचे. कारण तुम्हाला हिंदी बोलायला येत नाही. इंग्रजी बोलता येत नाही.
हे तुमचे लिमिटेशन्स महाराष्ट्राला माहिती नव्हत्या. आता आम्हाला सांगावं लागेल. जेव्हा दिल्लीत भाषणाची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरुममध्ये असायचे. जेव्हा शरद पवार यांची प्रसिद्धी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालून पिन मारुन पंचायत करुन टाकायचे. अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रात काय केलं ते सांगा… ( Jitendra Awhad VS Ajit Pawar )
‘तुम्ही 35 वर्षांच्या आयुष्यातील एक निर्णय असा सांगा की तो महाराष्ट्राला आवडला, महाराष्ट्राने त्या निर्णयाने तुमचा गौरव केला, असा एक निर्णय सांगा. तुम्हाला 48 तास देतो. एक निर्णय सांगा. महाराष्ट्रात काय केलं ते सांगा.
अर्थ नियोजन खात्यात तुम्ही क्रांतीकारी केलं असा निर्णय सांगा. तुमच्या भागात येणारा सीएसआर फंड कोण आणतं ते सांगा. हे सगळे कारखानदार शरद पवारांचे मित्र आहेत ते पाठवतात”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं. ( Jitendra Awhad VS Ajit Pawar )