नवी दिल्ली: किशोरवयीनांची सायबर छळापासून सुटका करणारे ऍप तयार करणाऱ्या सादत रहमान या बांगलादेशी किशोरवयीन मुलाला जागतिक शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.
मानवी हक्क कार्यकर्त्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मलाया युसूफ यांनी या पुरस्काराची घोषणा केली. सायबर टिन हे ऍप बनवून त्याद्वारे मुलांचा होणारा सायबर छळ थांबवला त्यासाठी चळवळ उभारल्याबद्दल ही निवड करण्यात आली.
सायबर छळाला कंटाळून एका 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केली त्यानंतर सादतने ही प्रचार मोहीम सुरू केली सायबर टिन हे ऍप गरजू किशोतवयीनांना मदत मिळवून। देणारे व्यासपीठ आहे सायबर छळ सहन करणाऱ्या सुमारे 300 गरजूंना आतापर्यंत मदत मिळवून दिली आहे तर असा छळ करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली.
45 हजार किशोरवयीन हे ऍप वापरतात. 2017 मध्ये रोहिनगे बांगलादेशात आश्रयाला आले. त्यांच्यासाठी मी मदतीचे कार्यक्रम घेतले त्यावेळी मला तरुणांच्या ताकदीचा अंदाज आला. ज्यावेळी सायबर बुलिंग पूर्णतः थांबेल आणि या ऍपची गरज कोणालाही भासणार नाही ते आमचे यश असेल, अशी भावना सादतने व्यक्त केली.