मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा देव समजले जाणारे सुपरस्टार ‘रजनीकांत’ हे तुमच्या आमच्यासारखा हाडामासाचा माणूस आहेत. पण तमिळनाडूमध्ये त्यांना देवाचा दर्जा मिळाला आहे.
View this post on Instagram
आपल्या जादुई अभिनयातून जेवढं त्यांनी नाव कमवलं त्याहून कित्येक पटीने त्यांनी लोकांची मदत करून नाव कमावलं आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोखोंच्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग आहे. रजनीकांत यांचा चित्रपट येणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात त्यांची भूमिका अभिनेता धनुष साकारणार आहे. धनुषचा आपला असा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. त्याला ही भूमिका देऊ करण्यावर रजनीकांत यांनीही सहमती दर्शवल्याचं बोललं जातं. पण अद्याप धनुषने मात्र त्याला दुजोरा दिलेला नाही.
View this post on Instagram
सध्या धनुष आनंद एल राय यांचा चित्रपट करत आहे. त्यामुळे या रजनीकांत यांच्या चित्रपटाला कधी सुरूवात होईल ते अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र नव्या वर्षातल्या उत्तरार्धात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल असं बोललं जातं आहे.