ब्रिस्टल – चौकार व षटकारांची फटकेबाजी पाहावयास आलेल्या चाहत्यांची येथे पावसाच्या सरींमुळे निराशा झाली. पावसामुळे बांगलादेश व श्रीलंका यांच्यातील सामना रद्द करावा लागला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
Unfortunately, Bangladesh's #CWC19 fixture against Sri Lanka has been called off due to the inclement weather.
The points have been shared. pic.twitter.com/GHqKa0Hm48
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 11, 2019
या स्पर्धेत पावसामुळे रद्द झालेला हा तिसरा सामना आहे. याआधी श्रीलंका व पाकिस्तान या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही. दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज या सामन्यात प्रथम फलंदाजीस आलेल्या आफ्रिकेची 7.3 षटकात 2 बाद 29 अशी स्थिती असताना पावसाने त्यांना तारले. त्यानंतर एकाही चेंडूचा खेळ झाला नाही.
श्रीलंकेची पुढच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे. हा सामना शनिवारी होणार आहे. त्यानंतर सोमवारी बांगलादेश व वेस्ट इंडिज हा सामना होणार आहे.