मुंबई- काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची घटना समोर आली होती. मात्र, आता बिग बी यांच्या नंतर प्रसिद्ध गायक अदनान सामीचं देखील ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. या दोन्ही कलाकारांचे ट्विटर अकाउंट अगदी एक सारख्याच पद्धतीने हॅक करण्यात आले आहे. अदनानने लगेचच आपलं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती अन्य एका अकाउंटद्वारे चाहत्यांना दिली आहे.
दरम्यान, हॅकर्सनी अदनान सामीच्या ट्विटर अकाउंटचा प्रोफाइल पिक्चर बदलून त्याच्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला आहे. अभिनेते अभिताभ यांच्याबाबतीही हाच प्रकार घडून आला होता. अदनानच्या अकाउंटवरून हॅकर्सनी अनेक ट्विट पोस्ट केले आहेत.