हडपसर – बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्याकडून पुणे शहर तसेच हडपसर विधानसभा मतदार संघातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महंमद वाडी येथील जनसंपर्क कार्यालयात दररोज होणाऱया जनता दरबारात संपूर्ण पुणे शहर तसेच हडपसर मतदार संघातील समस्याग्रस्त लोक हजेरी लावून आपल्या समस्या मांडतात. गुरुवारी झालेल्या जनता दरबारवेळी मोठय़ा संख्येने लोकांची उपस्थिती होती.त्यावेळी नानांनी स्वतः नागरिकांसोबत खाली बसून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर मतदारसंघात तसेच संपूर्ण पुणे शहरात नाना भानगिरे चांगली कामगिरी बजावत आहेत.महंमदवाडी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात दररोज सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत ते सामान्य लोकांना भरपूर वेळ देत आहेत. आपली कामे लवकर सुटसुटीत व्हावीत या अपेक्षेने शहर व मतदार संघातील लोक नाना भानगिरे यांची भेट घ्यायला येत असतात. त्यातील सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होणार असे नसले तरी बहुतेकांच्या समस्या सोडवण्यास ते यशस्वी झाल्याने आमचे काम नाना करतील या भावनेने आम्ही येत असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला जी जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडत आहे.लोकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. ज्या जागेवरच सुटतील त्या लगेचच सोडवल्या जातात.ज्या समस्या सरकारने व मुख्यमंत्री साहेबांनी सोडवाव्यात असा समस्या व कामे याविषयी पत्रव्यवहार केला जातो आहे. आठवड्यात एकदा मुख्यमंत्री साहेबांना भेटून ही सर्व कामे दाखवली जातात. त्यावेळी योग्य असलेले काम तात्काळ केले जाते.
प्रमोदनाना भानगिरे (शहरप्रमुख- बाळासाहेबांची शिवसेना)